Home Cities भुसावळ भुसावळ डीआरएमकडून रावेर रेल्वेस्थानकात केली विविध कामांची पाहणी

भुसावळ डीआरएमकडून रावेर रेल्वेस्थानकात केली विविध कामांची पाहणी


bhusawal DRM

रावेर प्रतिनिधी । रेल्वेचे महाप्रबंधक यांचा 27 रोजी दौरा असल्यामुळे भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी रावेर रेल्वे स्टेशनला भेट देवून स्वच्छता, सुरक्षता, प्रवासांच्या समस्या व केलेल्या कामांची पाहणी केले. सोबत भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

मध्यम रेल्चेचे महाप्रबंधक श्री मित्तल यांचा भुसावळ विभागाचा 27 डिसेंबर रोजी दौरा आहे. या दौऱ्यात रेल्वे महाप्रबंधक रावेर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे प्रस्तावित असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी बोलतांना दिली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून येथील स्टेशनवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसुविधाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरु आहेत. संपूर्ण स्टेशनला रंगरंगोटी करण्यात आलेली असून सर्व सूचनाफलक व गाड्यांचे वेळापत्रक अद्यावत करण्यात आलेले आहे. डीआरएम यांनी मंगळवारी येथे दिलेल्या भेटीत प्लाटफार्मची पाहणी करीत संपूर्ण स्टेशनवरील साफसफाई व स्वच्छतेसह सूरक्षतेचेही पाहणी केली.

तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ सुरु असलेल्या बांधकामाची तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात येणाऱ्या टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग स्थळाच्या बांधकामाची पाहणी केली,  स्टेशनवर उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाच्या सूचना यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिले रूम, प्रवाशी जिना, पुरुष व स्त्री प्रवाशांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र प्रतीक्षालायाच्या कामाची पाहणी करून तात्काळ काम संपविण्याच्या सूचना श्री गुप्ता यांनी सोबत आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. सुमारे पावून तास डीआरएम गुप्ता यांनी रेल्वे स्टेशनची पाहणी केली आहे.

महिलांनी मांडला समस्याचा पाढा
यावेळी डीआरएम श्री गुप्ता पाहणी करून परत येत असतांना स्टेशना लागूण रहिवास करणाऱ्या महिलांना स्वच्छते बद्दल विचारतास महिलांनी तक्रारीचा पाढा वाचला बाहेर लाईट नसतो. अस्वच्छते मुळे खुप मच्छर झाल्याची तक्रार त्यांनी डीआरएम यांच्याकडे मांडली

मोकाट कुत्र्यांमुळे प्रवासी त्रस्त
रावेर रेल्वे स्टेशनवर मोकाट कुत्रे खुलेआम फिरत होते, आधीच डीआरएम यांचा दौरा आणि त्यात स्टेशनावर मस्त झोपलेले व फिरणाऱ्‍या कुत्र्यामुळे येथील अधिका-यांची एकच तारांबळ उडाली.

डीआरएम यांना दिले निवेदन
रावेर रेल्वे स्टेशनला इतर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, पेसेंजर गाड्यांची समस्या सुटावी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोरकर, युवराज महाजन, सुभाष अकोले, भास्कर राणे, बापू कासार, शेख रहीम पेंटर, एकनाथ पाटील आदीनी यावेळी निवेदन दिले.


Protected Content

Play sound