भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात अवैधरित्या गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत त्याच्या जवळील दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी भीमराव जानु इंगळे (वय-75) रा. वाल्मिक नगर, भुसावळ हा शहरात घरात अवैधरित्या व विनापरवाना दारू विक्री करत असल्याची माहिती भुसावळ पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी आज सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय भदाने, पोना रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर, पोकॉ विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी कारवाई करत संशयित आरोपी भीमराव इंगळे याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 660 रूपये किंमतीचे 180 एमएल टँगो पंच दारूच्या बारा बाटल्या हस्तगत केल्या. याप्रकरणी मुंबई प्रोव्हीजन ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.