Home धर्म-समाज भुसावळच्या डेली मार्केटमध्ये शहिदांना आदरांजली (व्हिडीओ)

भुसावळच्या डेली मार्केटमध्ये शहिदांना आदरांजली (व्हिडीओ)

0
33


भुसावळ प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आज सकाळी शहरातल्या डेली मार्केटमधील हिंदू-मुस्लीम व्यापारी व विक्रेत्यांनी आदरांजली अर्पण केली.

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र अतिशय तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने आज सकाळी शहरातील डेली मार्केटमधील व्यापारी आणि फळ विक्रेत्यांनी एकत्रीतपणे शहिदांना आदरांजली अर्पण केली. यात मार्केटमधील हिंदू-मुस्लीम व्यापारी व विक्रेते सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थितांनी पाकचा तीव्र निषेध व्यक्त करून शहिदांना आदरांजली अर्पण केली. भारत सरकारने कडक कारवाई करण्याची मागणीदेखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

पहा:– डेली मार्केटमधील आदरांजली कार्यक्रमाचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound