Home Cities भुसावळ काठीच्या आधाराने कॉम्बिग ऑपशनमध्ये सहभागी !

काठीच्या आधाराने कॉम्बिग ऑपशनमध्ये सहभागी !

0
27

पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांची कर्तव्यदक्षता

भुसावळ प्रतिनिधी । आपल्या पायाला झालेल्या जखमेमुळे हातात आधारासाठी काठी घ्यावी लागली तरी अशा स्थितीतही येथील शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे हे कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. त्यांचा हा कर्तव्यदक्षपणा कौतुकास पात्र ठरला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, शहर पोलीस स्टेशनचा पदभार संभाळल्यापासून त्यांच्या पायाला जखम झालेली असल्याने निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना आधारासाठी काठी घ्यावी लागली आहे. असे असूनही आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने रात्रीच्या वेळेस कॉम्बिग ऑपशन काठीचा आधार घेऊन करीत होते.

नासिक येथून भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पदभार सांभाळल्यापासून त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांना चालव्यासाठी अडचण येत होती.त्यातच काही दिवसांनी रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढून त्यांच्या कामात भर पडल्याने पायाला लागलेले असूनही खंबीर पणे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेच्या अधिकार्‍यांसोबत उभे राहून शांततेने अतिक्रमण त्यांच्या शहर हद्दीतील काढण्यास मदत केली.कोंबींग ऑपरेशनमध्ये बाळासाहेब ठोंबे यांचा हा कर्तव्यदक्षपणा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound