भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीच्या अंतर्गत आगामी परिचय मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
भोरगाव लेवा पंचायतीच्या माध्यमातून समाजातील घटस्फोटीत, विधवा, विधूर, शेतकरी, प्रौढ, व्यवसायिक व दिव्यांग विवाहेच्छुक युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन येथील संतोषी माता हॉलमध्ये ३ एप्रिलला करण्यात आले आहे. यासाठी नावनोदणीचा फॉर्म भरण्याची मुदत १० मार्चपर्यंत असून यात इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतीतर्फे उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी केले आहे.
भोरगाव लेवा पंचायत ऑफीस, पुरुषोत्तम जनरल स्टोअर्स, मामा पान सेंटर येथे मोफत नावनोंदणी केली जात आहे. विवाहेच्छुकांनी विहित मुदतीच्या आत नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.