भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून याच्या नियोजनासाठी येथे बैठक घेण्यात आली.
कोरोनाचे सावट कमी होत असल्याने यंदा भोरगाव लेवा पंचायतीतर्फे नोव्हेंबरमध्ये सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या अनुषंगाने आरती चौधरी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. या बैठकीला भोरगाव लेवा पंचायतीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, सुहास चौधरी, महेश फालक, परिक्षित बर्हाटे, शरद फेगडे, जयश्री चौधरी, डिगंबर महाजन आदी उपस्थित होते.
भोरगाव लेवा पंचायतीकडे आतापर्यंद दोन जणांचे विवाहाचे प्रस्ताव आले आहेत. आणखी दोन ते तीन प्रस्ताव आल्यावर तारीख ठरवली जाणार असल्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला. या संदर्भात लवकरच तारखेची घोषणा करण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरले.