Home Cities भुसावळ अ‍ॅड. भूषण चौधरींना श्रध्दांजली अर्पण करून वकिलांचे कामकाज बंद

अ‍ॅड. भूषण चौधरींना श्रध्दांजली अर्पण करून वकिलांचे कामकाज बंद

0
45

भुसावळ प्रतिनिधी । तालुका वकील संघातर्फे दिवंगत अ‍ॅड. भूषण. जी. चौधरी यांना सकाळी ११:०० वाजेला भुसावळ कोर्टाच्या आवारात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

रावेर तालुक्यातील मोरगाव गावातील भूषण.जी. चौधरी यांचा अपघात झाल्याने त्यांचा उपचार मुंबई येथे सुरू होता त्या दरम्यान त्यांचे निधन झाले होते. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भुसावळ तालुका वकील संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करून एक दिवसासाठी वकिलांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आले. आज कोर्टाचे कामकाज सुरू असले तरी वकील संघाच्या सदस्यांनी यात सहभागी न होण्याचे ठरविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound