Home धर्म-समाज भुसावळात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

भुसावळात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

0
37

ganvesh vatap

भुसावळ प्रतिनिधी । येथील स्वा.सै.कृ.पा.पाटील प्राथमिक विदया मंदीर विद्यालयात आज दि. २५ जुलै गुरुवार रोजी तालुक्याचे आमदार संजय सावकारे व समाजसेविका रजनी सावकारे यांचे नेतृत्त्वातून गरीब व होतकरू विदयार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे.

गरीब व होतकरू विदयार्थ्याच्या परिस्थितीची जाणीव असुन या विदयार्थ्याचा विकास होणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून हे कार्य माझ्या हातून घडत रहो, असे विदयार्थ्यांशी हितगुज वक्तव्य आमदार संजय सावकारे यांनी केले आहे. तर असेच उत्तमोत्तम समाजकार्य रंजनी सावकारे यांच्या हातून घडत असून यांच्या विविध कार्याचा उल्लेख करून परिक्षीत बऱ्हाटे यांनी त्यांच्यातील स्त्री शक्तीची स्तुती केली.  कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संजय सावकारे तर कार्यक्रमाला रजनी सावकारे, संस्थेचे अध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, चेअरमन पी.एस.लोखंडे, संचालक वाय.एन.झोपे, रमाशंकर दुबे, योगेश मांडे, मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, मुख्याध्यापक सुधीर पाटील आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. सुत्रसंचालन ममता फालक तर आभार प्रदर्शन सुनिता बऱ्हाटे यांनी मानले. मिनाक्षी चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound