भुसावळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

bhusaval

भुसावळ प्रतिनिधी । गुरुपौर्णिमानिमित्ताने आज मंगळवार रोजी गुरु जे.आर.शर्मा, विनोद शर्मा, गोपाल शर्मा व राम शर्मा यांचे पाद्यपुजन श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे करण्यात आले.

यावेळी गुरु जे.आर.शर्मा, विनोद शर्मा, गोपाल शर्मा व राम शर्मा यांचे पाद्यपुजन करण्यात आले. गुरुपौर्णिमानिमित्ताने सकाळी शहरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राधेश्याम लाहोटी, जे.बी.कोटेचा, श्यामसुंदर काबरा, अर्जून पटेल, संजय अग्रवाल, प्रेमलाल लढ्ढा, श्रीकांत लाहोटी यांनी पाद्यपुजन व शाल-श्रीफळ देऊन गुरुचे पुजन केले. व राधेश्याम लाहोटी यांनी गुरुंना कार्याची माहीती दिली. प्रसंगी संजय अग्रवाल, अनूप अग्रवाल, श्याम अग्रवाल, लालजी पटेल, गोपाल जांगीड, भंडारकर, संतोष नागला, संजय फालक, लीलाधर अग्रवाल, नगरसेवक प्रा.दिनेश राठी, राजेश जयसवाल, संतोष टाक, संदीप देवडा, विनोद शर्मा, युवराज शर्मा, मोहन भराडे, राजू भराडे, योगेश दरगड, गोपाल तिवारी, पिंटू हेडा, जितेंद्र राठोड, सुभाष शिरसाळे, निलेश शर्मा, पवन तिवारी, दिलीप टाक, प्रकाश अग्रवाल, राजेश चांडक, विलास पवार व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content