यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील ग्रामीण परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर असलेली संचलित भुवनेश्वरी विद्या प्रसारक मंडळाची नुकतीच पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुवनेश्वरी विद्या प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अध्यक्षपदी गोपाल पाटील, उपाध्यक्षपदी मुरलीधर चौधरी (थोरगव्हाण) व शिवाजी पाटील (मनवेल) तर सचिव पदी माजी.प.स.सदस्य अरुण पाटील यांची फेर निवड करण्यात आली आहे.
यांचा समावेश
अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 1 सचिव, महिला सदस्य व 10 कार्यकरणी सदस्य अशा 15 जागांसाठी दि. ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार होते. मात्र दि. ९ ऑगस्ट रोजी माघारीचा दिवशी 7 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णयअधिकारी तथा मुख्यध्यापक डी.व्हि.पाटील यांनी जाहीर केले. तसेच सदस्यपदी गयभू चौधरी (थोरगव्हाण), मनोहर पाटील (पिळोदा खुर्द्), श्रावण पाटील, राजेद्र पाटील, गोरख पाटील, लीलाधर पाटील, कैलास पाटील, अर्जून चौधरी, नानासाहेब पाटील, रण्छोड पाटील व महिला सदस्या पदी संगिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.