यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभूर्णी येथे १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमीपूजन जि.प.सदस्या अरूणा पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी – किनगाव ह्या जिल्हा परिषद गटातील सदस्या अरुणा पाटील आणि माजी सदस्य नानासाहेब आर.जी.पाटील यांच्या प्रयत्नातून १५व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत निधी मंजूर करून डांभुर्णी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक २ आझाद नगर येथे रस्ते वाळू व मुरमीकरण तसेच गटारी बांधकाम या दोन प्रकल्पाचे भूमिपूजन मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार रमेश चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अनिल साठे यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उमाकांत पाटील, माजी जि.प.सदस्य आर.जी. पाटील, माजी आमदार रमेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील यांनी केले, सूत्रसंचालन देवानंद कोळी तर आभार ग्रामपंचायत सदस्य शुभम गिरीश विसवे यांनी केले.