मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे आदिवासी कोळी समाजासाठी ५० लाख रुपयांचे मंजूर महर्षी वाल्मिकी सांस्कृतीक सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे या कामाला सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, विशेष अतिथि आदिवासी कोळी महासंघाचे राज्यउपाध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, प्रमुख पाहुणे, अशोक कांडेलकर माजी जि.प. अध्यक्ष जळगाव, डॉ जगदीश पाटील यांचेसह जेष्ठ समाज मार्गदर्शक देवचंद तायडे, दशरथ कांडेलकर, शालिग्राम पाटील, भगवान भोलाणे, तोताराम भोलाणे, शांताराम कांडेलकर, रविंद्र कांडेलकर, पुंडलिक पाटील, नथ्थु तायडे, सुरेश कोळी, डॉ.दिलीप तायडे, वाल्मिक भोलाणकर , संतोष कोळी नगरसेवक ,डॉ. दिवाकर पाटील नगरसेवक निलेश शिरसाठ, सुकलाल सांगळकर,शांताराम कोळी, गोपाळ सोनवणे, रमेश टाकरखेडे, गंभीर उन्हाळे, चंद्रकांत कोळी ,सौ.सुनिता कोळी, सौ आशा कोळी पाटील , ब्रिजलाल तायडे, विश्वनाथ कोळी , पंडीतराव कोळी ,योगेश्वर कोळी,पांडूरंग कोळी, मनोहर कोळी,ज्ञानेश्वर कठोरे, प्रल्हाद कांडेलकर ,मंगल कांडेलकर, महेंद्र मोंढाळे, संजय कांडेलकर, राजु कांडेलकर, राजू जाधव आदींसह असंख्य कोळी समाज बांधव उपस्थित होते.