अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गोवर्धन, डांगरी, कळमसरे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम डांगरी येथे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या निधीतून डांगरी ते मारवड रस्ता (१३ लक्ष) या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या जयश्री पाटील, अनिल शिसोदे, लोटन शिसोदे, सरपंचा मीनाताई पाटील, दीपक शिसोदे, छबिराम पाटील, अरुण शिंदे, योगेश शिसोदे, उदय शिसोदे, राजेंद्र शिसोदे, विजय शिसोदे, जयवंत शिसोदे, संदीप शिसोदे, अरुण शिसोदे यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अमळनेर ते निम रस्ता (७७ लक्ष) या रस्त्यांच्या कामाचे तसेच गोवर्धन येथील स्मशानभूमी दुरुस्तीकरण (२ लक्ष) व गोवर्धन येथील जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती (३ लक्ष) कामाचे यावेळी गोवर्धन येथे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवून तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे करण्यावरच भर असल्याचे आमदार अनिल भाईदास पाटील सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, उमाकांत साळुंखे, डॉ. विलास पाटील, संजय भदाने, गोकुळ साळुंखे, व्ही. डी. पाटील, राकेश मुंदडे, भिकन सिद्धपुरे, नरेंद्र पाटील, अनिल पाटील, मधू चव्हाण, छोटू पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कळमसरे शहापूर रस्त्याच्या कामासाठी ४० लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून त्या कामाचे भूमिपूजन ही आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, कळमसरे येथील सरपंच जगदिश निकम, भागवत कोळी, नंदू शर्मा, प्रकाश पाटील, प्रवीण राजपूत, राजेंद्र चौधरी, योगेंद्र राजपुत, दिनेश राजपूत, देवीदास चौधरी, हेमंत चौधरी, अरुण राजपूत, दिपचंद छाजेड, रमेश चौधरी तसेच शहापूर येथील सरपंच भानुदास पाटील, कैलास पाटील, माजी सरपंच संजय पाटील, पाडळसरेचे विकास पाटील, निलेश पाटील, तुषार पाटील, सचिन पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.