जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेले तोंडापूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
तोंडापूर हे गांव २० हजार लोकसंख्या असून येथे बरेच छोटेमोठे वाद होत असतात व गांव मोठे असल्या कारणाने बसस्टाँप परिसरात अवैध धंदे सुध्दा मोठ्या प्रमाणात चालतात गावठी दारुने तर तोंडापूर बसस्टाँप परिसरात हद्दच केलीय दर २-३ दिवसात गावठी दारुमुळे बसस्टाँप परिसरात मोठ्याप्रमाणात भांडणे होत असतात. या सर्व गोष्टींचा त्रास शेतात जाणाऱ्या महिलांना , शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना , बसस्टाँप परिसरातील व्यावसायिकांना व सामान्य माणसाला होतो. शुक्रवार हा दिवस बाजाराचा असल्यामुळे तोंडापूर येथे परिसरातुन हजारो महिला व पुरुष बाजारासाठी येत असतात गावठी दारु बसस्टाँप परिसरातच विक्री होत असल्यामुळे बसस्टाँप परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या सर्व गोष्टीत सामान्य माणुस भरडला जातो. बऱ्याच दिवसापासुन तोंडापूर येथील नागरिकांची मागणी होती की, ब्रिटीश काळातील तोंडापूर येथे पोलिस स्टेशनची जागा आहे. तेथे ही तोंडापूर पोलिस चौकी उभी रहावी यामुळे तरी तोंडापूर गावातील अवैध धंद्यांना आळा घालता येईल. पहुर पोलीस स्टेशन 25/30 कि.मी.अंतर असल्याने लोकांची ये जा करण्यास फरफड होते तोंडापूर गावात चौकी झाल्याने कायदा व सुवेवस्था अबाधित राहिल व होणारे गुन्हे गावातच मुडतील या अगोदरही ग्रामपंचायतचा ठराव घेवुन गावातील महिलांनी, तरुण वर्गाने व नागरिकांनी तसेच संभाजी ब्रिगेड तर्फे वेळोवेळी निवेदन पहुर पोलिस स्टेशन ते तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक आँफिस , उपविभागीय अधिकारी साहेब, स्थानिक शाखा आँफिस , दारुबंदी शाखा , दारु उत्पादन शुल्क, स्थानीक आमदार, मंत्री जि.प.सदस्य यांना दिलेले आहे. परंतु सर्वकाही नाकाम ठरलेल आहे व तोंडापूर गावात दारु विक्रेत्यांची दादागीरी वाढलीय नव्याने रुजु झालेले पोलिस निरिक्षक अरुण धनवडे हे कायदा व सुवेवस्थेशी प्रामाणिक असल्याने गुन्हेगारांच्या मनात त्यांचा दरारा पहुर पोलिस हद्दीत खुपच वाढलाय त्यामुळे ते लवकरच तोंडापूर गांव व परिसर दारुमुक्त व अवैध धंदे मुक्त करतील अशी अपेक्षा तोंडापूर परिसरातुन जनसामान्य नागरिक व संभाजी ब्रिगेड करत आहे.
यावेळी पो.नि. धनवडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल जो कोणी कायदा तोडेल, त्याची गय केली जाणार नाही. पोलिस प्रशासनाला सगळे सारखे असतात, मी ग्रामीण भागातीलच असल्याकारणाने माझी नाड ग्रामीन भागाशीच व जनसामान्यांशी जुळलेली आहे. तरुणांनी रोज व्यायाम केला पाहिजे, पळल पाहिजे, चालल पाहिजे, मी रोज 60 किलोमिटर चालतो अस धनवडे या वेळी सांगत होते. गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचेही त्यांनी यावेळेस सांगीतले. सर्व राजकिय भेदभाव दुर ठेवुन येत्या 26 जानेवारीला पोलिस चौकीच काम पुर्ण होवुन उदघाटन झाल पाहिजे या हेतुने काम करा व जास्तीत जास्त आर्थीक मदत पोलिस चौकी उभारण्यासाठी करा अस आव्हाण सर्वपक्षीय नेत्यांना यावेळी केले व २५ हजार रूपयांच मदतही केली. यावेळी डि.के.दादा पाटीलही येथे उपस्थीत होते ते बोलत असतांना सांग होते कि पोलिस चौकी झाल्याने निश्चितच तोंडापूर गावाला फायला होईल व गावातील वाद गावातच मुडतील नंतर पोलिस चौकिचे भुमिपुजन व टिक्कम मारुन सांगता करण्यात आली. याप्रसंगी तोंडापूर गावचे पोलिस पाटील जितेंद्र पाटील, उपसरपंच प्रदिप पाटील, ढालसिंगी येथील डाँ दिलीप पाटील, भारत पाटील, कुंभारीचे सरपंच सुरतसिंग जोशी, नाना पाटील, रंगनाथ काळे, कैलास पाटील, महेंद्र शेट खिवसरा, गोपाल पाटील, राम अपार, बिट तोंडापूर हवलदार नवल हटकर, सुरवाडे दादा व होमगार्ड पत्रकार कैलास कोळी , पत्रकार सतिश बिर्हाडे , ग्रामपंचायत सदस्य , सर्वपक्षीय कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते.