पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे )। पहूर पेठ येथील राम मंदिर ट्रस्ट च्या वतीने व पहूर भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त प्राचीन राम मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी डाॅ. प्रशांत पांढरे व कीर्ती पांढरे यांच्याहस्ते राम मंदिरात महापूजा करण्यात येवून आरती व प्रसाद वाटप करण्यात आला. महापूजा पं. सुभाष जोशी यांनी मंत्रोच्चारात केली. पहूर पेठ गावांत ठिकठिकाणी भगवे झेंडे व विजयी पताका लावून, अंगणात रांगोळी काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ५०० वर्षांपासूनची राम मंदिर प्रतीक्षा संपल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करून राम नामाचा जयघोष केला . लवकरच भव्य राम मंदिर अस्तित्वात येईल अशी कामना उपस्थितांनी केली. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष भाऊराव पाटील, पहूर पेठच्या सरपंच सौ. नीताताई पाटील, माजी जि.प. सदस्य. राजधर पांढरे, सरपंचपती रामेश्वर पाटील, ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अनिल देवरे यांचेसह नागरीक उपस्थित होते. या सोहळ्यात लक्षपूर्वक सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.
https://www.facebook.com/watch/?v=1392595237617124