जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरात नगर परिषदेमार्फत केल्या जाणाऱ्या ६४ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते ओसिया माता नगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, मुख्याधिकारी नितीन बागुल यांचेसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे अनमोल सहकार्याने जामनेर नगर परिषदेमार्फत शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजना अंतर्गत 13 कोटी 73 लाख, विविध रस्त्यांच्या सिमेंट करण व डांबरीकरण, नाट्यगृह बांधकाम 25 कोटी 26 लाख, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी युथ क्लब, अभ्यासिका व वाचनालय बांधकामासाठी साठ लाख, मल निसारण प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत 25 कोटी 26 लाख अशा एकूण 64 कोटी 5 लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज १६ मार्च रोजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नितीन बागुल आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना म्हणाले की राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार महाजन यांनी अत्यंत कमी वेळात भरघोस निधी उपलब्ध करून दिला. अत्याधुनिक शहराची त्यांची संकल्पना उदयास येत असून 18 महिन्याच्या कालावधीत संपूर्ण कामे पूर्ण होतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर हे आपल्या भाषणात म्हणाले की नामदार गिरीश महाजन यांच्यासारखा दूर दृष्टिकोन असलेला नेता शहर व तालुक्याला लाभला असून बारामती पलीकडे विकास करून संपूर्ण राज्यात जामनेर शहर विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जाईल असा विकास झपाट्याने होत असून या विकासामध्ये प्रशासकीय यंत्रणाचाही मोठा सहभाग आहे म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही त्यांनी आपल्या भाषणातून प्रशंसा केली. यावेळी नगराध्यक्ष साधनाताई महाजन शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नामदार महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, नगरसेवक अनिस भाई, आतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, उल्हास पाटील, शेख रिजवान, दत्तू सोनवणे, नाजीम पार्टी, जयेश पाटील, मनीष पाटील, माजी प.स. सभापती छगन झाल्टे, के. बी. माळी, प्राध्यापक सुधीर साठे कैलास पालवे,प्रशांत सरताळे, सर्व नगरसेवक उपस्थित होते कर वसुली अधिकारी रविकांत डांगे यांनी यावेळी सूत्रसंचालन व आभार मानले. अभियंता प्रदीप धनके, सूर्यवंशी, विजय सपकाळे, सुरज पाटील, लोखंडे, अमर राऊत, नम्रता देशपांडे, गजानन माळी व इतर कर्मचाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.