सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री क्षेत्र पंढरपूर येथे वै डिंगम्बर महाराज मठाचे प्रांगणात भव्य सभामंडप उभारला जाणार असून त्याचे भूमिपूजन प पु प्रभाकर दादा बोधले अधिपती संत माणकोजी महाराज बोधले यांचे शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष नरेंद्र नारखेडे होते.
सभामंडप साठी लागणारा निधी ना गिरीश महाजन यांनी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाने एक कोटी मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. सदर काम सहा महिन्यात पूर्ण होईल.
कार्यक्रमास उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोळे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, विश्वस्त जयराम पाटील, त्रंबक चौधरी, अतुल तळेले, जनार्दन भारंबे, रमेश भंगाळे, मधुकर बॉंडे, झेंडूजी महाराज बेळीकर, मठ अध्यक्ष रमाकांत भांरबे, पंढरीनाथ पाटील, विकास पाटील, हर्शल महाराज, खिर्डीकर प्रमोद बढे, गिरीश वारके, ठेकेदार तेजस निकम, मयूर नारखेडे, अक्षय परदेशी सह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते.