पंतप्रधानाच्या हस्ते २९,००० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव नेस्को येथील कार्यक्रमात सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात महत्वाकांक्षी ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्यांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बोगद्यांमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी टळून ठाण्यातून बोरीवलीला अर्ध्या तासांत पोहचता येणार आहे. सीएसएमटी येथील 10 आणि 11 फलाटांच्या लांबी वाढविल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांचे डबे वाढणार आहे.त्यामुळे जादा प्रवाशांची सोय होणार आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा, बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुव्हीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असणार आहे. पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार आणि तुळशी तलावांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्याची गरज नाही.

Protected Content