अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कलाली गावासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक विकासकामे मंजूर झाल्याने या कामांचे भूमिपूजन जि.प.सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कलाली येथे हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
जयश्री पाटील यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करून सत्कार केला. अतिशय महत्वपूर्ण विकास कामे गावासाठी दिल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच श्रीकृष्ण नाना पाटील, चत्रभुज पाटील, विजयाबाई कोळी (उपसरपंच), मनोज कोळी, प्रमोद पाटील, योगेश कोळी, शेखर पाटील, भिका भिल, मंगल भिल, प्रमोद पाटील (ग्रा.पं.सदस्य), चुनीलाल पाटील, गोपाल पाटील, गोकुळ सुर्यवंशी, गौरव चव्हाण यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन –
नाबार्ड अंतर्गत सात्री गावाच्या रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करणे, रक्कम रु ७७ लक्ष, २५१५ अंतर्गत- सभामंडप बांधणे १० लक्ष, जि.प द. व.सु.अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे रक्कम ५ लक्ष, जि.प. द. व.सु – पाईप गटार करणे- रक्कम ५ लक्ष, जि.प द. व.सु – पाण्याची टाकी बांधणे- रक्कम ५ लक्ष ,आमदार निधी अंतर्गत मराठी शाळा खोली डिजिटल करणे रक्कम ३ लक्ष, डी.पी.डी.सी. मराठी शाळेचा वॉल कंपाऊंड बांधणे – रक्कम १० लक्ष, मातोश्री पानद रस्ता अंतर्गत गुलाब सोपान पाटील ते प्रभाकर दत्तात्रय पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे. – रक्कम २४ लक्ष असे एकूण १३९ लाखाच्या कामांचे भूमिपूजन जयश्री पाटील यांचे हस्ते करण्यात आले.