Home महिला बचत गटाच्या सभागृहाचे मुक्ताईनगरात भूमिपुजन

बचत गटाच्या सभागृहाचे मुक्ताईनगरात भूमिपुजन

0
72
( Image Credit Source : Live Trends News )

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आलेल्या बचत गटाच्या महिलांसाठी खास उभारण्यात येणार्‍या सभागृहाचे भूमिपुजन आज त्यांच्याच हस्ते करण्यात आले.

( Image Credit Source : Live Trends News )

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मानव विकास अंतर्गत उन्नती कापडी पिशवी महिला बचत गट मुक्ताईनगर यांच्याकडे उत्पादनाचे मोठमोठे मशनरी व साहित्य आल्यामुळे सदरील होतकरू महिला बचत गटाकडे हक्काची जागा उपलब्ध नसल्याने भाडेतत्त्वावरील महागडे हॉल त्यांना परवडत नव्हते. ही अडचण त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली. यावर आमदारांनी क्षणाचाही विलंबना लावता सदरील महिला बचत गटाला जागेसह भरून निधीचे सभागृह मंजूर करून दिले.

या कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते आज पार पडले. या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे ,नगरसेवक संतोष मराठे, किर्तनकार दुर्गा मराठे ,शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सरिता कोळी, सुभाष बनिये, नरेंद्र गावंडे, संतोष माळी, विजेंद्र लिहेकर यांचेसह महिला बचत गटाच्या सहयोगीनी मंगला चौधरी, माया तायडे, अध्यक्षा रेखा रवींद्र माळी, रत्ना संजय माळी, अर्चना दुबे, संध्या मगरे, संगीता माळी, रेखा अवतारे, दिपाली जैन, रोहिणी जोगी, वैशाली कोळी, बेबिबाई सोनवणे, प्रतिभा बावस्कर, सुशीला पाटील आणि सुषमा लिहेकर आदिंची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound