पारोळा प्रतिनिधी । तालूक्यात कजगाव चौफुली ते तरवाडे रस्त्यांसाठी १४ कोटी १० लक्ष आणि तरवाडे आर्वी बोळे या रस्त्यासाठी २ कोटी १३ लक्ष रुपये मंजूर झाले असून या विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील कजगाव चौफुली ते वाकड्या पुलापर्यंत या रस्त्यावर मध्येभागी दुभाजक आणि दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना रस्ते तयार करण्यात येतील. याचबरोबर लाईटची व्यवस्था देखील केली असल्याची माहिती आ. सतीश पाटिल यांनी भूमिपूजन प्रसंगी दिली आहे. पुढे म्हणाले, जनतेला मी दिलेला शब्द आज पूर्ण केलाय. शहरात क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, ट्रामा केयर सेंटर आद्यवत बसस्थानक आणले. नदीजोडच्या माध्यमातून विकास साधला बोरीवर अनेक ठिकाणी केटीवेअर आणले. आणि मतदारसंघात चौफेर विकास साधणार आहे. अलीकडेच्या काळात यूती शासनाने मेगा भरती सुरू केली. ती नोकरीसाठी नाही तर महाराष्ट्रचा विकास साधला असे हे सांगत फिरत आहे. मग यांना फोडाफोडीची काय गरज आहे, असा प्रश्न आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली नाही, पीकविमा मिळाला नाही, दुष्काळी अनुदान मिळाले नाही, विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी स्थिर राहिलो, प्रलोभनाला बळी पडलो नाही. जनतेच्या विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कार्यकर्तेसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.