नवी दिल्ली, वृत्तसेवा | नवी दिल्लीत ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ‘अंधाधूनला’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’साठी राष्ट्रीय पुरस्कार, अरिजित सिंह ठरला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून घोषित करण्यात आले. तसेच ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार, ‘अंधाधुन’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार. ‘केजीएफ’ला सर्वोत्कृष्ट अॅक्शन पुरस्कार, ‘पद्मावत’ला सर्वोत्कृष्ट संगीतचा पुरस्कार , ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घुमर’ला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन पुरस्कार, आदित्य सुहास यांच्या ‘खरवास’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शॉर्ट चित्रपट (फीचर) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.