Home Cities पाचोरा भोजे येथे विकासकामांचा शुभारंम

भोजे येथे विकासकामांचा शुभारंम

0
41

bhoje vikaskame

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील भोजे येथे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नांनी करण्यात येणार्‍या दोन विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.

मधुकर काटे यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील भोजे येथील जि.प. शाळेसाठी शेष अंतर्गत शाळे साठी तार कम्पाउंड करणे तसेच मूलभूत सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमिस पेव्हरब्लॉक बसविणे या दोन कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्यासह सरपंच कडूबा गोविंदा उभाळे, भाजपा अध्यक्ष प्रमोद पाटील, यशवंत पवार , निलेश हिवाळे ,रवींद्र बिवसने, शिवाजी उभाळे ,चिंचपुरे सरपंच विनोद पाटील, बाळू भाऊराव पाटिल आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound