
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भावलाल महाजन (पहेलवान) तर व्हाइस चेअरमनपदी तुषार मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत चेअरमन पदासाठी भावलाल महाजन (पहेलवान) यांचा, तर व्हाइस चेअरमन पदासाठी तुषार मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या वेळी सचिव कोतकर यांनी निवड प्रक्रियेला सहकार्य केले. सभेला सोसायटीचे सदस्य ज्ञानेश्वर महाजन, डी. एन. महाजन, देविदास महाजन, सुधाकर महाजन, छायाबाई महाजन, विनोद तायडे, रामदास महाजन आदी उपस्थित होते.
निवडीची घोषणा होताच एस.आर. चौधरी, ई.जे. महाजन, कैलास वाणी, अयुब मेंबर, भागवत चौधरी, प्रल्हाद महाजन, पद्माकर महाजन, पिंटू महाजन, अशोक गायकवाड यांनी दोन्ही निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.



