Home राजकीय बारामतीत नणंद विरूध्द भावजय लढत होणार

बारामतीत नणंद विरूध्द भावजय लढत होणार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. त्यामुळे बारामतीत आता सुप्रिय सुळे आणि सुनेत्रा पवार असा नणंद विरूध्द भावजय असा थेट सामना होणार आहे.

सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहे. काही वेळापूर्वी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव पत्रकार परिषद घेऊन अधिकृत केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्वात मोठी लढत बारामती मतदारसंघात होणार आहे. अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणूकीत त्यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. पण आता पक्षातर्फे त्यांचे नाव अधिकृत करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound