जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी कांताई सभागृहात झालेल्या २५ वर्षाआतील बुध्दिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ७ फेऱ्याअखेर ६.५ गुण मिळवित भावेश कहाणे(१७२२) याने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
भावेश कहाणे यास १००० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर दुसर्या स्थानी जळगावचा बिगरमानकीत खेळाडू जयेश निंबाळकर याने ५.५ गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले. त्यास ७०० रुपये प्राप्त केले.तर तिसरे स्थान विवेक तायडे (१३४०) ५०० रुपयांचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत २५ वर्षाआतील गटातील पहिल्या पाच खेळाडूंना रोख पारितोषिक तर सहा ते दहा क्रमांक व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना जळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेतर्फे रोख रक्कम व बुध्दिबळ संच देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार फारूक शेख तर अतिथी म्हणून जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे पदाधिकारी अँड. हेमंत मुदलियार, चंद्रशेखर देशमुख, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला त्यात एकूण २२ फिडे मानांकित खेळाडू होते.जळगावसह धुळे, शहादा, नंदुरबार, भुसावळ, पाचोरा, चाळीसगांव येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभाचे सुत्रांचालन प्रवीण ठाकरे यांनी तर आभार रवींद्र धर्माधिकारी यांनी मानले.