भुसावळ प्रतिनिधी । भारतीय बौध्द महासभेची बैठक जळगावातील वाघ नगर येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत नूतन जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी शैलेंद्र जाधव तर सचिवपदी सुभाष सपकाळे यांची निवड करण्यात आली.
भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीरा आंबेडकर यांच्या आदेशानुसार चैत्यभुमीचे भन्ते अशोक कीर्ती, राष्ट्रीय उपसचिव एस.एस.वानखेडे व राष्ट्रीय संघटक धम्मदुत तायडे, प्रदेशाध्यक्ष यू.जी.बोराडे यांच्या उपस्थिती होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष के.वाय.सुरवाडे हे होते त्यांनी मागील कार्यकारिणीने केलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रास्ताविक सन्सारे वकिल यांनी केले.
नूतन जिल्हा कार्यकारिणी घोषीत
अध्यक्षपदी शैलेंद्र जाधव, सचिवपदी सुभाष सपकाळे, कोषाध्यक्षपदी भाऊलाल पवार, महासचिव सुमंगल आहिरे, उपाध्यक्ष संस्कार विभाग सुशील हिवाळे, महिला उपाध्यक्षपदी लता बिऱ्हाडे, महिला सचिव वैशाली सरदार, कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे, हिशोब तपासणीस ए.टि.सुरळकर, पर्यटन प्रसार रा.धे.निकम, उपाध्यक्ष (सरंक्षण) युवराज नरवाडे, सचिवपदी रमेश साळवे, प्रियंका आहीरे, भीमराव पवार, बाळू बोदडे, संघटकपदी विजय अवसरमल, सुमित्रा सर्वटकर, हितेंद्र मोरे, सुनील आढणगले यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शेलेंद्र जाधव यांनी मानले.