जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणार अट्टल गुन्हेगारास शहरातील आकाशवाणी चौकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातील सोन्याचे दागिन्यासह 2 लाख 1 हजार 339 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी घडली घटना
याबाबत माहिती अशी की, शिवाजी नगरातील शिरीन अपार्टमेंट येथील रहिवाशी खुर्शिदा हुसेन मजहर (वय-80) हे सेवानिवृत्त असून 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडी कोयंडातोडून घरातील एकूण सोन्याचे दागीन्यांसह रोख रक्कम रूपये असा एकूण 1 लाख 74 हजार रूपयांचा मद्देमाल चोरू नेला होता. तसेच त्याच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी आणि एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. याबाबत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अट्टल गुन्हेगार पप्पु शहाबान हसन अन्सारी (वय-53) रा. धुळे हा जळगावातील आकाशवाणी चौकात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडली घेतली असता गुन्ह्यातील 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. यात दोन सोन्याच्या बांगड्या व 5 अंगठ्या असा एकूण 2 लाख 1 हजार 339 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशतिय आरोपी हा भरदिवसा घरफोडी करत होता.
वेगवेगळ्या जिल्ह्यातही अनेक गुन्हे
संशयित आरोपी पप्पु शहाबान हसन अन्सारी हा धुळे शहरासह जळगाव, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, नंदुरबार, जिल्ह्यात तसेच आंतर राज्यात देखील गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीताने जळगाव शहरात गुन्हें केल्याचे कबुल केलेले असुन त्या व्यतीरीक्त आणखी बरेच गुन्हें उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स.पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी एलसीबीचे बापू रोहम यांना दिलेल्या सुचनेनुसार स.फौ. चंद्रकांत पाटील, अशोक महाजन, पो.ह. अनिल इंगळे, संतोष मायकल, सुनिल दामोदरे, भास्कर पाटील, विजयसिंग पाटील, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, विजय शा.पाटील, परेष महाजन, दर्शन ढाकणे, इंद्रीस पठाण तसेच तांत्रिक माहिती करीता पोहेकॉ विजय दे.पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांना नेमले होते.