सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । भरधाव आयशरची प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालकासह एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रावेर तालुक्यातील गाते गावाजवळ घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात आयशर ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील गाते येथील स्मशानभूमीजवळून रिक्षा चालक मेघराज शांताराम चौधरी हे रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीटी ८०८७) ने प्रवाशी जितेंद्र काशिनाथ चौधरी रा. उदळी ता. रावेर यांना घेवून जात होते. त्यावेळी समोरून (युपी ७८ एफएन ६७२९) क्रमांकाच्या आयशर ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात धडकेत रिक्षा चालक मेघराज चौधरी आणि जितेंद्र चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले. रिक्षाच्या मागे दुचाकीने येत असलेल्या दिलीप रामदास तायडे (वय-५१) रा. उदळी खुर्द ता. रावेर यांनी तातडीने धाव घेवून दोन्ही जखमींना फैजूपर शहरातील खासगी डॉक्टरांकडून उपचारासाठी दाखल केले. दरम्यान अपघात घडल्यानंतर आयशर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला होता. याप्रकरणी दुचाकीधारक दिलीप तायडे यांच्या फिर्यादीवरून सावद पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ,