पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त, जळगाव जिल्ह्याचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते, येथील भाजपा कार्यालयात भारत मातेची पूजा करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, माजी नगरसेवक भावडू राजपूत, धीरज महाजन, गोपाल अग्रवाल, वैशाली मेटकर, गोपाल दाणेज, नाना सुखदेव पाटील, बापू महाजन, अनिल टोळकर, रवींद्र भोमा पाटील, सचिन गुजराती, विनोद हिंदुजा आणि भाजपाचे माजी शहर प्रमुख मुकुंदा चौधरी यांच्यासह शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावित धीरज महाजन यांनी केले. त्यात जनसंघापासून भारतीय जनता पक्ष वेगळा होऊन ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झाला. तो आज तागायात कार्यकर्त्यांच्या बळावर प्रगतीपथावर आहे. स्थापनेपासून आजपर्यंत आपले देशाविषयी असलेले विचार आपण कायम ठेवलेले आहेत. म्हणूनच आज हा विजयी दिवस पाहायला मिळत आहे. माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी आपले विचार मांडताना सांगितले की कोणी एक व्यक्ती कधीही मोठा नसतो. तर संघटनेचा विचार मोठा असतो. तोच विचार आपण पुढे न्यायचा आहे.
त्याचप्रमाणे माजी खासदार ए. टी. पाटील यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील झालेल्या घडामोडी पाहता पक्ष कार्यकर्त्यांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावरून दिसून येत आहे. असाच उत्साह आपल्याला या निवडणुकीत कायम टिकवून ठेवायचा आहे. असे मार्गदर्शन देखील त्यांनी केले. शेवटी आभार रवींद्र पाटील यांनी मानले.