जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या अभिवादन कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार श्री. सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. योगेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुर्बान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने समन्वय साधत चोख नियोजन केले.



