भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण

Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । घरासमोर सुरू असलेल्या भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला तिघांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत शनीपेठ पोलीसात तिघांविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा नोदविण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रितेश आनंदा मोरे (वय-18) रा. आंबेडकर नगर यांच्या घरासमोर भांडण सुरू असतांना सोडविण्यास गेला असता विशाला डोंगरे, समाधान डोंगरे आणि लखन डोंगरे या तिघांना लाठ्या काठ्यांना मारहाण केली. शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. जखमी अवस्थेत प्रितेश याला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रतिशच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पो.ना. गणेश गवाळे करीत आहे.

Protected Content