रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील भामलवडी येथे शिव रस्ता प्रश्न शेतकरी आणि सोलर कंपनीचे इंजिनिअर यांचेतील वाद विकोपाला गेला असता निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या माध्यस्थीने सोडविण्यात आला असून सदर शिव रस्ता मोकळा करण्यात महसूल विभागाला यश मिळाले आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की, भामलवाडी येथे गुरचरणात सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येत असून यापरिसरातील काही शेतकऱ्यांनी शिव रस्त्याला विरोध केला होता. सदर वाद विकोपाला जातं असतांना तहसीलदार बंडू कापसे यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना पाचरण करून घटनास्थळी पाठविले. त्या ठिकाणी साधारण दोन किमी अंतराचे शेती शिवारातील सुमारे 50 ते 60 शेतकरी जमा झाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याआधी निंभोरा सहपोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी सहकारी सोबत उपस्थिती दिली. तायडे यांनी सर्व उपस्थित शेतकरी यांना शासनाची बाजू समजावून सांगून हा रस्ता शेतकरी हिताचा कसा आहे हे पटवून दिले त्यामुळे सर्व शेतकरी यांनी स्वयं बंद केलेला रस्ता मोकळा केला. या मुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.