स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतींना उजाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार व खासदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरीभाऊ जावळे यांच्या स्मृती दिनी भालोद येथे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करत आठवणींना उजाळा देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्या दुसर्‍या स्मृती दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातील मुख्य कार्यक्रम त्यांची जन्मभूमि असणार्‍या भालोद गावात करण्यात आले. येथील सखाराम ग्रामीण सहकारी पतसंस्था येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाला मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, डांभुर्णीचे अजित चौधरी, चेअरमन हेमलता इंगळे, हर्षल पाटील, पद्माकर महाजन, सुरेश धनके, डॉ.कुंदन फेगडे, चोपड्याचे शांताराम आबा पाटील, हिरालाल चौधरी, माजी जिल्हा परिषद सभापती हर्षल पाटील या मान्यवरांचा समावेश होता.

सुरवातीला स्व.हरिभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी हरीभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी गणेश नेहेते, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, नारायण चौधरी, मुन्ना पाटील, नंदू महाजन, सविता भालेराव, कांचन फालक, उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, लालचंद पाटील, अमोल जावळे, प्रदीप जावळे, प्रवीण परतणे, अरुण चौधरी, दिलीप चौधरी, नितीन चौधरी, किशोर नेहेते, संजय ढाके आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हरीभाऊवर प्रेम करणार्‍या मान्यवरांची उपस्थिती होती. अमोल जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: