मुंबई प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचे थोर सुपुत्र तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना फोनवरून धमकी आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी काही दिवसांपूर्वी धमकी आली होती. यानंतर आता त्यांना पुन्हा फोनवरून धमकावण्यात आले असून याबाबत वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालचंद्र नेमाडे यांना एका अनोळखी नंबरवरुन धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील वादग्रस्त उल्लेखामुळं नेमाडे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. नेमाडे यांच्या या कादंबरीत लमाण महिलाविषयी लिखाण करण्यातं आलेलं आहे. या लिखाणाबद्दल एका अज्ञात व्यक्तीनं आक्षेप घेतलाय. नेमाडे यांचं हे लिखाण बदनामीकारक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात घुसून मारहाण करु, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.