भैरवी साळुंखेला संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण

3aa578b8 e4f3 4cc2 93bc e5ec28e5a1be

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील डी.आर. कन्या शाळेची विद्यार्थिनी भैरवी ज्ञानेश्वर साळुंखे हिला मार्च २०१९ च्या दहावीच्या परीक्षेच्या संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. तसेच ती एकूण 91:80 टक्क्यांनी उत्तीर्ण झालीय.

 

या संदर्भात भैरवी साळुंखेशी संपर्क साधला असता ती म्हणाली, परीक्षेतील यश सतत वाचन, प्रश्नपत्रिका सराव, आजोबा,आई,वडीलांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे मिळाले. भविष्यात स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा मानस असल्याचेही भैरवीने सांगितले. भैरवीला डी.आर. कन्या शाळेचे शिक्षक मोराणकर,वर्गशिक्षिका जे.के सोनवणे मॅडम, बाविस्कर मॅडम व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाचे अभिनंदन माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी प्राचार्य शांताराम पाटील,आई, वडील ग्रामसेवक ज्ञानेश्वर साळुंके यांनी केले आहे. तर मित्र परिवाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून भैरवीवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

Add Comment

Protected Content