अमळनेर प्रतिनिधी । येथील बी.आर. कन्या शाळेतून प्रथम आलेल्या भैरवी साळुंखे हिने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचा मानस व्यक्त केला आहे.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने भैरवी साळुंखे हिच्या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी तिच्यासोबत वार्तालाप केला. यात ती म्हणाली की, मला दहावीच्या परीक्षेत नियोजनबद्ध अभ्यास, प्रश्न पत्रीकेचा सराव ,शिक्षकांचे व आजोबांचे मार्गदर्शन यामुळे चांगले गुण मिळाले. माझ्या यशात माझे आई वडील,प्रा.किरण माळी,विनोद जाधव,सौ गरूड मँडम यांनी मला योग्य मार्गदर्शन केले. दहावीनंतर विज्ञान विषयात पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. भविष्यात एक अधिकारी होऊन प्रामाणिकपणे सेवा करणार असल्याचे तिने सांगितले. याप्रसंगी तिचे आजोबा माजी जि.प सदस्य बापूसाहेब शांताराम पाटील,वडील ग्रामसेवक ज्ञानेश्वर साळुंखे व आई उपस्थित होत्या.