नवी दिल्ली । मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.
तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.