अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन व पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी भागवत पंडित पाटील यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट ) कॉंग्रेस पक्षाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी बुके व नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
अमळनेर तालुक्यातुन पांच जण इच्छुक होते त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अमळनेर तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेल्या भागवत पाटील यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली .
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे एकनिष्ठ काम करीत पक्ष वाढीसाठी व ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून आपल्या कार्याची चुणूक पक्ष श्रेष्ठीना दाखवून दिली ,तर अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना दिलासा देण्याचे कार्य केले. त्या आधारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते भागवत पाटील यांची अमळनेर तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करून बुके व नियुक्तीपत्र देत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.
यावेळी जेष्ठ नेते अनिल शिसोदे , देखरेख संघाचे माजी चेअरमन पिंटू राजपूत , डॉक्टर रामराम पाटील , शत्रुघ्न पाटील , विद्यार्थी संघटनेचे भूषण पाटील , गिरीश पाटील , शिवाजी दासभाऊ , दीपक पाटील , मार्केटचे चेअरमन अशोक पाटील ,संचालक समाधान धनगर आदींची उपस्थिती होती.
भागवत पाटील यांच्या निवडीबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील , पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, कळमसरे येथील पत्रकार प्रा. हिरालाल पाटील ,गजानन पाटील ,पाडळसरे येथील पत्रकार गौरवकुमार पाटील , कळमसरे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाबूलाल पाटील, पाडळसरे विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, सरपंच शुभांगी पाटील ,उपसरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच रविंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.