भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाच्या जाचक कायद्यांच्या विरोधात माफदा संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये येथील कृषी केंद्रांचे संचालक सहभागी होणार आहेत.
राज्य शासनाच्या नियोजीक कृषी कायद्याविषयी जाचक अशा पाच कायद्यांच्या माध्यमातून कृषी निविष्ठाधारकांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा निषेधार्थ म्हणून माफदा संघटनेने २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत माफदा संघटनेने बंद पुकारला आहे.
या संपाबाबतचे निवेदन भडगाव तालुका सीड्स पेस्टिसाइड व डीलर असोसिएशन भडगाव च्या वतीने भडगाव तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी भडगाव तसेच तहसीलदार भडगाव यांना बंद बाबतच्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भडगाव तालुक्यातील भडगाव तालुका असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव सुनील पाटील, प्रमुख सल्लागार प्रकाश राठोड, खजिनदार समाधान पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारक उपस्थित होते. याप्रसंगी माफदाच्या बंदमध्ये सहभागी होऊन कडकडीत बंद पाडण्याचे नियोजन करण्यात आले.
या संदर्भात दीपक पाटील म्हणाले की, शेतकर्यांसाठी तयार केलेल्या कायद्याचा आम्हाला विरोध नसून यामध्ये फक्त कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. शासनाने कृषी निविष्ठा धारकांना जो गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो रद्द करावा व अप्रमानित कृषी निवृष्ट्या बाबत उत्पादक कंपन्यांना ग्राह्य धरावे.