भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याची सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जिल्ह्याचे नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर व सदस्य नोंदणी अभियान जिल्हा संयोजक सचिन पानपाटील यांच्या सूचनेवरून पाचोरा विधानसभा मतदारसंघ प्रभारी के. बी. दादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
भडगाव तालुक्याची सदस्य नोंदणी अभियान संदर्भात कार्यशाळा आज भडगाव येथील सुशिल जिनींग येथे संपन्न झाली. यावेळी सदस्य नोंदणी करण्यासाठी बाजारात, यात्रेत, शाळा, काॅलेज, बस स्टॉप व गर्दिच्या ठिकाणी स्टॉल लावून तसेच घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करायची आहे. तसेच जे शिर्डी येथील प्रदेश अधिवेशन साठी अपेक्षित आहेत. त्यांनी २५० सदस्य नोंदणी करूनच यायचे आहे. असे के बी दादा साळुंखे यांनी सांगितले. भडगाव तालुक्यासाठी २५ हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट आम्ही पुर्ण करणार असे आश्वासन अमोल भाऊ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्षा नुतनताई पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, तालुका सरचिटणीस विनोद नेरकर, पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी सैनिक जिल्हाध्यक्ष देविदास पाटील, अंत्योदय जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, शहराध्यक्ष धर्मेंद्र परदेशी, नरेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ खैरनार, जिल्हा चिटणीस विकास महाजन, महिला आघाडी विधानसभा प्रमुख प्रतिभा साठे, तालुकाध्यक्ष सविता चौधरी, शहराध्यक्ष सरिता पाटील, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक शुभम सुराणा, भाजयुमो विधानसभा संयोजक किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, दगडू महाजन, जगन्नाथ महाजन, भगवान पाटील, रतिलाल पाटील, राजेंद्र शिंपी, अरुण पाटील, विशाल पाटील, शरद हिरे, गोरख महाजन सह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.