भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव येथील प्रस्तावित एआरटीओ कार्यालयाच्या विरोधात भडगावकड एकजुट झाले असून पदाधिकार्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित एआरटीओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे व्हावे. यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध प्रतिनिधीनी मी भडगावकर म्हणुन आपली भुमिका मांडत आरटीओ कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय साठी एकजुटीने लढा देण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत मी भडगावकर….आम्ही भडगावकर हा एकच नारा देत २३ फेब्रुवारी २०२४ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच पुढील शासकीय पातळीवरील लढा देण्यासंदर्भात जबाबदारी वाटप करून सर्व समंतीने ८ ठराव पारीत करण्यात आले.
भडगाव येथील प्रस्तावित आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे पळविण्यात आले तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालय बाबत देखिल हीच गत आहे. यामुळे भडगांवकर संतप्त झाले आहे. पुढील लढा उभारण्यासाठी आयोजित बैठकीस सचिन चोरडिया, अनिल वाघ, लखीचंद पाटील, सोमनाथ पाटील, सुयोग जैन, हर्षल पाटील, सचिन पाटील, रविंद्र सोनवणे, इम्रान अली, योजनाताई पाटील, शंकर मारवाडी, विजय भोसले, संजय सोनवणे, मनोहर चौधरी, डॉ. नीळकंठ पाटील, विलास नेरकर, दिलीप शेंडे, रतिलाल महाजन, कीरण शिंपी, आण्णा मोरे, निलेश पाटील, प्रा. उत्तमराव पाटील, अमोल पाटील, अँड. निलेश तिवारी, निलेश मालपुरे, हाजी जाकीर शेठ, भैय्यासाहेब पाटील, रविंद्र अहिरे, मिलिंद बोरसे, नाना हडपे, जे. के. पाटील, प्रदिप पाटील, अमोल कांबळे, धर्मेद्र परदेशी, नरेंद्र पाटील विजय साळुंखे गोडगाव सह आदी शेकडो च्या संख्येने भडगावकर उपस्थित होते.
या बैठकीत सोमनाथ पाटील, शंकर मारवाडी, विजय भोसले, अनिल वाघ, इम्रान अली सैय्यद, डॉ. निळकंठ पाटील, भैय्यासाहेब पाटील, चौधरी, परदेशी, हाजी जाकीरशेठ, विजय सांळुखे, संजय पवार यांनी आंदोलन संदर्भात मते मांडली. यात आरटीओ कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय पळविल्याने भडगावकर च्या भावना दुखावल्या गेले आहे. तालुक्याच्या अस्मितेसाठी हा लढा आहे. त्यासाठी तालुक्यातील जनतेने सक्रीय व्हावे. तालुक्यासाठी योगदान देण्याची तयारी ठेवावी.
या आंदोलनात तालुक्यातील नागरीकांनीच सहभागी व्हावे. भडगावकराचा नेहमीचयुजर आणि थ्रो म्हणुन वापर झाला आहे. हा कलंक पुसण्याची वेळ आली आहे. पक्षीय जोडे बाजुला काढुन भडगावकर म्हणुन एक व्हा. २०११ पासुन आरटीओ कार्यालय आंदोलनास सुरवात झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको करण्यात असताना तो काळा दिवस पाळुन आंदोलन करावे. रस्ता रोको साठी ग्रामीण भागात जनजागृती साठी तालुक्यातील गावा-गावात दवंडी देण्यात यावी. आपण अन्याय सहन करत राहणार का ? असाच अन्याय वर अन्याय होत राहिला तर आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. तसेच ज्यांना जे शक्य आहे. ते योगदान द्यावे असे मते याप्रसंगी मांडण्यात आले.
दरम्यान, या बैठकीत सर्वानुमते आंदोलन संदर्भात ८ ठराव या बैठकीत पारीत करण्यात आले. व आंदोलनाची दिशा या ८ नुसारच राहिल असे निश्चित करून बैठकी नंतर २३ फेब्रुवारीचे रस्ता रोको आंदोलन बाबत तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.