भडगाव प्रतिनिधी । शहरातील महादेव गल्लीतील २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह चौघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, येथिल महादेव गल्लीतील २५ वर्षीय महिलेने घरात छताला दोरीने गळफास घेऊन अत्महत्या केली. याबाबत मयत महिलेची आई मिनाबाई गुलाब भामरे रा. आचाळे ता.जि. धुळे यांनी भडगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी मयत भाग्यश्री हिला ट्रक्टरचे हप्ते फेडण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे या कारणावरुन वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ पती गणेश पाटील, सासरे बाजीराव राजाराम पाटील, सासु उषाबाई पाटील (सर्व रा. महादेव गल्ली, भडगाव) यांनी केला.
तसेच मावस दीर विनोद अशोक पाटील (रा. सातारणे ता. धुळे, ह. मु. भडगाव) हा मयत भाग्यश्री हिला त्याचेशी प्रेमसंबध ठेवायला सांगायचा. या सर्व जाचाला कंटाळुन मुलगी भाग्यश्री हीने अत्महत्या केली आहे.
याबाबत मयत महिलेची आई मिनाबाई भामरे यांच्या फिर्यादीवरुन पती गणेश पाटील, सासरे बाजीराव पाटील, सासु उषाबाई पाटील तसेच मावसदीर विनोद अशोक पाटील रा. सातारणे ता. धुळे, यांच्या विरुध्द गुरनं ७६/२०२१ भादवी कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उप निरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहेत.