भडगाव प्रतिनिधी । येथील पंचायत समीतीच्या सभापतीपदी भाजपच्या डाॅ. अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या हेमलता पाटील यांनी नुकताच राजीनामा दिला होता. निवड घोषित झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पंचायत समती आवारात एकच जल्लोष केला.
तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती घोडमिसे याच्यां अध्यक्षेतखाली पंचायतीच्या दालनात सभा झाली. त्यात सभापती पदिसाठी एकमेव डाॅ. अर्चना पाटील यांचा अर्ज आल्याने दुपारी तिन वाजता त्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी टी.पी.मोरे उपस्थित होते.
डाॅ. अर्चना पाटील यांची निवड झाल्यानंतर पंचायत समीती आवारात कार्यकर्त्यानी फटाके फोडत अन् गुलाल उधळून जल्लोष केला. उघड्या जीपवरून त्यांची मिरवणूक ही काढण्यात आलि. वडगाव गावाला डाॅ. अर्चना पाटील यांच्या रूपाने पहील्यांच सभापतीपद मिळाल्याने गावक-यानी एकच जल्लोष केल्याचे पहावयास मिळाला. तर डाॅ. अर्चना पाटील यांचे पती डाॅ. विशाल पाटील यांनी दोन दिवसापुर्वीच मुबंईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता.
यावेळी पाचोरा नगरपरीषदेच्या माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, पंचायत समीती सदस्या हेमलता पाटील, उपसभापती प्रताप सोनवणे, रामकृष्ण पाटील, रावण भिल्ल, युवानेते संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, सहकार आघाडीचे युवराज पाटील, राजेंद्र मोरे वडजी, डाॅ. विशाल पाटील, जे.के.पाटील, बाजार समीतीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, गोरख पाटील, राष्ट्रवादि काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, विजय पाटील लोणपिराचे, बापु पाटील वडगाव, शिवणीचे माजी सरपंच स्वरूप पाटील आदि उपस्थित होते.