Home Cities भडगाव भडगाव नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहिर

भडगाव नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहिर


19 मार्च रोजी होणार निवड

भडगाव (सागर महाजन)। भडगाव नगरपालिका नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिल्यानंतर भडगाव नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जाहीर केला असून नगराध्यक्ष पदाची निवड 19 मार्च रोजी होणार आहे.

नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम याप्रमाणे –
12 रोजी नामनिर्देशन स्विकारणे
13 रोजी छाननी
14 रोजी अपिल दाखल करणे
16 रोजी वैध नामनिर्देशन प्रसिध्द करणे
18 रोजी उमेदवारी माघारी घेणे
19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष पदाचा घोषीत करणे.

असा कार्यक्रम राहणार असून नगराध्यक्ष कोण होणार याकडे भडगावकर आणि राजकिय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound