भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडा येथे आज झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पळासखेडा येथे एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसर हादराला आहे. यात अशोक शिवाजी पाटील हा इसम जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार जमीनीच्या वादातून ही घटना घडली असून यातील जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गोळीबारात अशोक शिवाजी पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले की, आमचा आणि पळासखेडा येथील विजय दोधा पाटील यांचा जुना वाद आहे. हा वाद रस्त्यावरून आहे. आज सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास आमच्या त्यांच्याशी पुन्हा एकदा वाद झाला. यात विजय दोधा पाटील यांनी त्यांच्याकडील पिस्तुल काढून माझ्यावर चार फैरी झाडल्या. यातील एक गोळी माझ्या पाटीला लागली असून आपण यात जखमी झालो असल्याची माहिती अशोक पाटील यांनी दिली.