भडगाव प्रतिनिधी | शहरातील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे या जवानाचा लेह-लडाख येथे कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला असून त्यांचे पार्थीव सोमवारी सकाळी येथे येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येथील टोणगाव भागातील रहीवाशी निलेश रामभाऊ सोनवणे (वय ३०) या जवानाचे कर्तव्यावर असतांना लेह-लडाख मधे निधन झाल्याची घटना घडली. जवान निलेश रामभाऊ सोनवणे या जवानाचे निधन झाल्याचे वृत्त भडगाव येथे पसरताच सोनवणे परीवारसह परीसरात, तालुक्यात शोककळा पसरली. निलेश सोनवणे यांच्या टोणगाव भागातील घरा जवळ परीसरातील नागरीक, मित्र परीवार, युवकांची मोठी गर्दी केली होती. जवानाचे पार्थिव सोमवारी सकाळ पर्यत भडगावात येण्याची शक्यता आहे.
शहरातील टोणगाव भागातील रहीवाशी निलेश सोनवणे या भारतीय सैन्यात महार रेजिमंट मध्ये कार्यरत होता. या जवानाचे आज काश्मिर मधील लेह लडाख येथे सेवा बजावत असताना निधन झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहीतीनुसार सकाळी सेवेवर असताना जवान निलेश सोनवणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. पण याबाबत अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकला नाही. जवानाचे पार्थिव लेह येथून विमानाने दिल्ली येथे आणले जाणार आहे. तेथून नाशिक किंवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत पार्थिव भडगावला पोहचेल. त्यानंतर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
निलेश सोनवणे २०१० पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. जवानच्या निधनाची बातमी शहरात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली. पश्चात आई व पाच भाऊ आहेत. दोन मोठे बंधू बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस सेवेत कर्तव्यावर आहेत. तर तीन भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतात.