Home क्राईम भादली येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण 

भादली येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण 

0
67

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले आहे. याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आला नाही. अखेर मंगळवारी ४ जूलै रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.


Protected Content

Play sound