जळगाव प्रतिनिधी | जळगाव-भादली रेल्वे लाईन दरम्यान 55 वर्षीय व्यक्तीने रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याचे सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, याबाबत माहिती अशी की, जळगाव भादली डाऊन रेल्वे खंबा क्रमांक 422/17 जवळ सुरेश मंगा महाजन (वय-५५, रा. भवानीनगर, नशिराबाद) यांनी आत्महत्या केल्याचे सकाळी 11.30 ते 11.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. रेल्वे प्रबंधक एस.सी. मोरे यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास साहेबराव पाटील करीत आहे.