भडगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरा येथे गिरणा नदी पात्राबाहेर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा न करता पळवून नेल्या प्रकरणी एकाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळुची रात्री वाहतूक सुरु आहे. त्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे. तालुक्यातील निंभोरा येथे गिरणा नदी पात्राबाहेर निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र. (अंधारात नंबर दिसून न आला ) ५००० किंमतीची एक ब्रास वाळू विना परवाना अवैध पणे वाहतूक करताना तलाठी पाशा हलकारे यांना मिळून आले.
हे ट्रक्टर तहसील कार्यालयात जमा न करता त्यातील भरलेली वाळू हाट्रॉलीक करून ट्रॉली मधील वाळू उपसा करून मी वाहन तहसील कार्यालयात लावणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करून घ्या. अशी दमदाटी करून शासकीय कामात अडथळा केला म्हणून तलाठी पाशा अजीज हलकारे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीसात आरोपी सचिन राजेंद्र जाधव रा. कोठली यांच्या विरोधात गुरन ९८/२०२२ भादवी कलम ३७९, १८६, ५०६ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक मनोज माळी हे करीत आहेत.